आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात मुसळधार; पुण्यामध्ये शहराच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/कोल्हापूर- उन्हाळा सुरू होऊन काही दिवसच झाले असले तरी वातावरणात प्रचंड उकाडा आणि तीव्र उन्हाच्या झळानी हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना गुढी पाडव्याच्या दिवशी मुसळधार पडलेल्या पावसाने काही अंशी दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले होते. पुण्यामध्ये शहराच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

 

 

आज दुपारी आकाशात ढग दाटून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. शहरात सर्वच ठिकाणी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे रविवारच्या बाजाराचा दिवस आणि त्यातच गुढी पाडवा असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच फेरीवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काही अंशी दिलासा दिला आणि हवेत गारवा पसरल्याने आल्हाददायक  वातावरण पसरले. मात्र रात्री पुन्हा प्रचंड उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता वाढली आहे.

 

 

पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी-चिंचवडमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.

पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली. परंतु आजचा रविवारचा दिवस असल्याने अनेकांनी आखलेल्या खरेदीच्या बेतावर त्यामुळे पाणी पडले. पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला. 

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...