आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पुजेसाठी सर्व जातीचे पूजारी नेमणार; मंगळवारपासून मुलाखती All Castes Pujaris Will Be Appointed At Ambabai Temple In Kolhapur

ऐतिहासिक निर्णय..अंबाबाईच्या मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमणार; मंगळवारपासून मुलाखती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमण्यात येणार आहे. येत्या मंगळवारपासून (ता.19) अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.

 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी करवीरवासियांनी केली होती. यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलनही झाले होते. पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या निर्णयाला विधानसभेत बहुमताने विधेयक मंजूर करण्यात आले होते. या पगारी पुजाऱ्यांमध्ये 50 टक्‍के महिला पुजारीही असणार आहेत. यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पूजारी नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे.

 

55 पदांसाठी एकूण 117 अर्ज प्राप्त‍ झाले आहेत. त्यात 6 महिलांचाही समावेश आहे. अंबाबाईच्या धार्मिक विधींचे ज्ञान असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

 

विद्यमान पुजाऱ्यांपैकी एकाचाही अर्ज नाही..

अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाकडे दुर्लक्ष करून  विद्यमान पुजार्‍यांपैकी एकाने अर्ज केला नसल्याची माहिती मिळाली आहे. 

 

19 जूनपासून तीन दिवस मुलाखती...

पुजार्‍यांच्या मुलाखती घेण्यासाठी सहा सदस्यीय समिती गठीत करण्‍यात आली आहे. मंगळवारपासून (19 जून)  तीन दिवस मुलाखती घेतल्या जाणार आहेत. उमेदवाराचे सामाजिक जीवन, वर्तणूक, वयोमर्यादा, पावित्र्याचे पालन याची माहिती घेण्यात येणार आहे. या निकषाला पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी न्याय विधी विभागाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन दिले जाईल.

 

या समितीत धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषा तज्ज्ञ प्राध्यापक शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे आणि शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

 

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देणार...

मुलाखतीत निवड झालेल्या पुजाऱ्यांना देवीच्या धार्मिक विधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंबाबाईची नित्यपूजा, मंत्रपठण, धार्मिक विधी, साडी पेहराव, उत्सव काळातील पूजा, काकड आरती ते शेज आरतीपर्यंतचे विधी शिकविल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...