आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dangerous: कचरापेटीत दोन मृत अर्भके, चार गर्भाशय सापडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- जिल्ह्यातील मलकापूर येथील एका कचरापेटीत दोन मृत अर्भके, चार गर्भाशय आणि औषधींचा बॉक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. बेकायदा गर्भलिंग निदान किंवा अनैतिक संबंधातून हे कृत्य झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. मलकापूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना भाजी मंडईच्या इमारतीजवळ कचरापेटीत ही अर्भके सापडली.

 

याबाबत शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अर्भकात पुरूष जातीचे एक आणि स्त्री जातीचे एक आहेत.

 

सोमवारीही कचरापेटीत सापडले होते 6 मृत अर्भके... 

एका कचरापेटीत सोमवारी (2 जूलै) सहा मृत अर्भके आढळली होती. नगरपालिका स्वच्छता कर्मचार्‍यांना ही अर्भके नवीन भाजीमंडई परिसरातील कचऱ्यात सापडली होती. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील म्हैशाळमध्ये असे रॅकेट उघड झाले होते. या प्रकरणातही मोठे रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास शाहूवाडी पोलिस करत आहेत.


पुढील स्लाइ्ड्‍सवर क्लिक करून पाहा व्हिडिओ.. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली दोन अभ्रके आणि चार गर्भाशय

 

बातम्या आणखी आहेत...