आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी, नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. पंचगंगा नदीलाही पूर आला असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. नदीकाठच्या गावांनाही यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा फोटो... नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले

बातम्या आणखी आहेत...