आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रवणबेळगाेळ येथे फेब्रुवारीत महामस्तकाभिषेक साेहळा;राष्ट्रपती, पंतप्रधान मोदीही येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली-  कर्नाटकातील श्रवणबेळगाेळ येथे भगवान बाहुबली स्वामी यांचा महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या साेहळ्यासाठी देश-विदेशातून ८० लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जगद््गुरू चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम हाेत अाहे, अशी माहिती  साेहळा समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी पत्रकारांना दिली.  


७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते साेहळ्याचे उद्घाटन हाेईल. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रित केले आहे. कर्नाटक सरकारने या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दिला अाहे. या सोहळ्यानंतर श्रवणबेळगोळ येथे ५० कोटी रुपये खर्च करून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. २० एकर जागेत सर्वसोयींनी युक्त २०० खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. तसेच या ठिकाणी प्राकृत विश्वविद्यापीठही स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने २० कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.  


तीन लिफ्टची सुविधा  
- विंध्यगिरी पर्वतावरील महामस्तकाभिषेक साेहळ्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून चार मजली डाेंगर उभारण्यात आला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी दोन लिफ्ट व अभिषेक सामग्रीसाठी स्वतंत्र लिफ्टची सोय केली आहे. दररोज ८ हजार लोक डाेंगरावर चढू शकतील.  
- बाहुबलींच्या भव्य मूर्तीवर  पुरातत्त्व विभागाने विशेष रसायनाचा लेप दिला आहे.  
- दररोज ३ लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.    
- चंद्रगिरी पर्वतावरून एक लाख लाेकांना हा साेहळा पाहता यावा, अशी व्यवस्था केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...