आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाच्या हलक्या सरी; आंबा, काजूला फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर/पुणे- ढगाळ वातावरणात आज पुणेकरांची सकाळ उजाडली. कोथरूड परिसरात पावसाचा हलका शिडकावा झाला आहे. शिवाजीनगर, डेक्कन परिसरातही हलका पाऊस कोसळला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागास आणि कोकणात अवकाळी पावसाने काल झोडपून काढले. मुंबईतही पावसाचा हलका शिडकावा झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कळे, बाजारभोगाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे आंबा आणि काजू पिकांवर संकट कोसळले आहे. 

 

 

वातावरणात जाणवत होता उकाडा

कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारपासून हवेत उकाडा जाणवत होता. वातावरण ढगाळ होते. सायंकाळी अचानक जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळत असल्याचे सांगण्यात येत होते.