आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर- नव्वदीतल्या वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या एका नराधम नराधमाला आज कोल्हापुर जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विष्णू कृष्णा नलवडे (52) असे या नराधमाचे नाव आहे. भुदरगड तालुक्यातील नांगरवाडी गावी 4 मार्च 2015 रोजी अंथरूणावर खिळलेल्या एका असहाय वृद्धेवर या नराधमाने कुकर्म केले होते.
या नराधमाला पकडून शेजाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या नराधमाविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरु होता. एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि भुदरगड पोलिस ठाण्याचे अधिकारी एम. एस. घाडगे, सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ, हवालदार तुकाराम पाटील,पोलिस निरीक्षक बी़. टी़. बारवकर यांच्यासह इतर सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यामुळे आज या नरपशूला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी न्यायमूर्ती आदिती कदम यांच्यासमोर केलेला युक्तिवाद, णि वरिष्ठ न्यायालयातील दिलेले दाखले त्याचबरोबर प्रत्यक्ष पुरावे ग्राह्य मानून न्यायालयानेही आरोपीला दोषी ठरवले. सरकारी वकील पिरजादे यांनी केली होती फाशीची मागणी सरकारी वकील ए. एस. पिरजादे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पीडित वृद्धा ही अंथरुणावर खिळून होती.तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन या नराधमाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला आहे.आरोपीचे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.आरोपी हा त्याचे वर्तणूक सुधारण्याच्या पलीकडे आहे. आरोपीचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्याने केलेले कृत्य हे एका महिलेविरुद्ध नसून ते संपूर्ण समाजाच्या विरोधात आहे. महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे असे आहे. या महिलेवर केलेला अतिप्रसंग हा आरोपीची क्रूर मानसिकता दर्शवतो. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.