आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापूरमध्‍ये भावाच्‍या पत्‍नीवर वारंवार बलात्कार; दिरासह पती विरोधात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्‍हापूर-  शहरातील रुईकर कॉलनी परिसरात सख्‍ख्या भावाच्या पत्‍नीवर असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार बलात्‍कार केल्‍याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सरद घटनेची माहिती महिलेने पतीला दिली मात्र पतीने उलट घटनेची कुठे वाच्‍यता केल्‍याल जीवे मारण्‍याची धमकी दिली. अखेर या महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात तक्रार दिल्‍यानंतर पोलिसांनी महिलेचा पती आणि दिराला अटक केली आहे. 


या विषयी अधिक माहिती अशी की, शहरातील रुईकर कॉलनी परिसरात राहणा-या रमजान झाकीर हुसेन आगा (२४) याने आपल्‍या सख्‍या भावाच्या पत्‍नीवर असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार बलात्‍कार केला. सदर घटना पीडीत महिलेने आपले पती अली अकबर झाकीर हुसेन (२६) यांना सांगितली मात्र पतीने याकडे काना डोळा केला. उलट भावाची बाजू घेऊन पीडीत महिलेचा शारिरीक व मानसीक छळ केला. घटनेची कुठे वाच्‍यता केल्‍यास जीवे मारेल अशी धमकी दिली. छळाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसात तक्रार दिली.  

बातम्या आणखी आहेत...