आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- शिक्षकांच्या न्याय मागण्यांबाबत आंदोलन करून शिक्षकांनी कोल्हापुरात चक्क राज्य सरकारच्या विरोधात भिक मागून आपला निषेध व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विना अनुदानित वर्ग, तुकडी शिक्षक कृती समितीच्यावतीने आज शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी भीक मागो आंदोलन करून शासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वळवण्याचा प्रयत्न केला. 

 


मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या सन 2012- 13 या सालात 5 हजार 973 तुकड्यांना सरकारने मान्यता दिली होती. मात्र चार वर्षे उलटले तरीही या तुकड्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. या तुकड्यांचे तात्काळ मूल्यांकन करावे. शिक्षकांचे थकीत वेतन देण्यात यावे. शाळांना अनुदान प्राप्त करून द्यावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले.

 


यावेळी कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विनाअनुदानित तुकडी व वर्ग कृती समितीचे अध्यक्ष जिनेश पुरवंत, उपाध्यक्ष सीमा पाटील, अनिल टेकाळे अमित कांदळकर, नामदेव यमेटकर, यांच्यासह अन्याय होत असलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...