आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात महापालिकेने पाटबंधारे विभागाच्या इमारतींचा पाणीपट्टी थकवल्याने पाणीपुरवठा तोडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेच्या मोहिमेअंतर्गत आज 97 लाख 55 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाच्या पंचगंगा व वारणाभवन या इमारतींचा पाणी पुरवठा करणारी सहा कनेक्शन बंद करण्यात आली.
 

 

पाटबंधारेच्या पंचगंगा भवनकडे 35 लाख 61 हजार 397 रुपये व वारणाभवन या इमारतीकडे 61 लाख 93 हजार 977 रुपये अशी एकूण रु.97 लाख 55 हजार 374  इतकी थकबाकी आहे.
ही थकबाकी भरण्यासाठी महापालिकेने पाटबंधारे खात्याला जानेवारी 2018 मध्ये रितसर नोटीस बजावली होती. मुदत देवूनही थकबाकी न भरल्याने आज पाटबंधारेच्या दोन्ही कार्यालयाचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई महापालिकेच्या वसुली पथकाने केली. ही कारवाई वसुली अधिकारी मोहन जाधव, मिटर रिडर पंडीत भादूलकर, रमेश मगदूम, एन.डी.चौगुले, रणजित संकपाळ, उदय पाटील, ताजूद्दीन सिध्दनाळे व कर्मचारी यांनी केली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...