आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण: कोण आहेत \'आप\'मध्ये प्रवेश करणारे सुधीर सावंत; ही आहे पार्श्वभूमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर/मुंबई- सिंदखेड राजा येथे 12 जानेवारीला होणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या मेळाव्यात कर्नल सुधीर सावंत आपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुधीर सावंत यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील मानगुट्टी गावात 9 फेब्रुवारी 1955 रोजी झाला. त्यांचे वडील सीताराम सखाराम सावंत यांनी स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात ते शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय झाले. 1957 ते 1972 या काळात सी. स. सावंत हे आमदार राहिले. जन्मापासूनच सुधीर सावंतांवर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता.

 

 

सेनादलातून निवृत्त झाल्यानंतर 1991 ला राजीव गांधींनी सुधीर सावंतांना राजकारणात आणले. कोकणातील राजापूर मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले. हा मतदारसंघ 1952 नंतर काँग्रेसने कधीही जिंकला नव्हता. त्याकाळात कोकणात मधु दंडवतेंचा चांगलाच प्रभाव होता. 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी शिवराज्य पक्षाची स्थापना केली होती. 

 

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया व शिवराज्य पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीचे ते उमेदवार होते पण त्यांच्या आघाडीचा एक उमेदवार निवडून आला नाही. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...