आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात ​शैक्षणिक धोरणाविरोधात महिलांनी काढली सरकारची प्रेतयात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोल्हापूर- शिक्षणाचे कंपनीकरण करून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आज कोल्हापुरातील बिंदू चौकातून दसरा चौकापर्यंत चक्क महिलांनी राज्य शासनाची प्रेत यात्रा काढली आणि जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.

 


आज सकाळी बिंदू चौक येथून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकारने कंपन्यांना शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे विधेयक विधानपरिषदे समोर मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर 10 पटाच्या आतील 1314 शाळा बंद केल्या आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने 30 पटसंख्या असलेल्या आणि त्यानंतर वरील पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण प्रस्तावित आहे. बीड जिल्ह्यात राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी 80 हजार शाळा बंद करण्याबाबतचे सूतोवाच केला. यामुळे गोरगरिबांच्या, वाड्या वस्त्यांवरील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा धोका निर्माण झाला आहे. संविधानातील बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्याच्या धोरणाविरोधात सरकारची ही धोरणे आहेत. याविरोधात राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापुरातही सरकारच्या या धोरणाविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. आज महिलांनी चक्क राज्य सरकारची प्रेत यात्राच काढून या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आणि शासनाला शिक्षणाचे कंपनीकरण थांबवावे आणि हे विधेयक मागे घ्यावे अशी विनंती सुद्धा या मोर्चात करण्यात आली.
या मोर्चात कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे, नगरसेविका निलोफर आजरेकर यांच्यासह शिक्षक पालक आणि नागरिक ही या मोर्चात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...