आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण: CID कडून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली/कोल्हापूर- पोलिस दलाची खाकी मलिन करणार्‍या  सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणात सीआयडीकडून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. 6 नोव्हेंबर राेजी सांगली पोलिसांच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. आरोपींनी पलायन केल्याचा बनावही पोलिसांनी केला होता. अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिस अधिकारी युवराज कामटेसह 12 पोलिसांना निलंबित केले आहे. तसेच पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षक दीपाली काळे यांची बदली करण्यात आलेली आहे. दरम्यान, मृतदेहाची तपासणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दोन महिने करण्यात आली. त्यामुळे अनिकेतवर सव्वादोन महिन्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आली होती.

 

 

अनिकेतचा मृतदेह 7 नाेव्हेंबर राेजी अांबाेली घाटात सापडल्याचा पाेलिसांचा दावा हाेता. त्यानंतर पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, त्यानंतर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तब्बल दोन महिने तपासणी सुरू होती. तपासणीची ही प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाली. त्यानंतर सीआयडीने अनिकेतचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...