आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वास्तूत रक्ताचा सडा; 27 वार करून सासऱ्याने केला सुनेचा खून, नातवंडे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- घरात आंघोळीचे पाणी तापवण्याच्या कारणावरून सासऱ्याने सूनेचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत, पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ सावर्डे या गावात ही घटना घडली आहे. पांडुरंग दशरथ सातपुते असे चाकुने हल्ला करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे. कळे पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

शुभांगी रमेश सातपुते यांचा त्यांच्या सासऱ्याने खून केला. मयुरेश, तनिष्का अशी जखमी नातवंडाची नावे आहेत. पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ सावर्डे गावात आज सकाळी ही घटना घडली. सासरा पांडुरंग दशरथ सातपुते याच्यावर कळे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चपला खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे पांडुरंग सातपुते हे पत्नी शांताबाई  मुलगा रमेश सून शुभांगी, दोन नातवंडे मयुरेश ,तनिष्का असे सहा जण मल्हार पेठ सावर्डे गावात राहतात. त्यांची पत्नी शांताबाई आणि सून शुभांगी या दोघी सासू-सुनेचे पटत नव्हते.

 

 

दोघींच्या वादामूळे घरात नेहमी वातावरण तणावाचे असायचे. पती रमेश आणि सासरा पांडुरंग हे दोघेही सासू सुनेच्या सततच्या भांडणामुळे वैतागून गेले होते. रमेश आपल्या पत्नीची आणि वडिलांची समजूत काढून वातावरण शांत ठेवायचा प्रयत्न करत होता. आज सकाळी 7 वाजता रमेश सातपुते हे बांबवडे येथे चप्पल विक्रीच्या वसुलीसाठी गेले होते. या दरम्यान आंघोळीसाठी पाणी तापवण्यावरुन सासू-सुनेचा जोरदार वाद सुरु झाला. दोघींनी एकमेकींना शिवीगाळ केली, या वादात सून शुभांगी सासूच्या अंगावर धावली. शांताबाई यांनी हा प्रकार आपले पती पांडुरंग यांना सांगितला.

 

 

सून वारंवार आपल्याला त्रास देते हा राग पांडुरंग यांच्या मनात खदखदत होता. त्यातच पत्नीला मारहाण झाल्याचे समजल्यावर रागाच्या भरात पांडुरंग याने दोघींच्या वादात पडून सुनेला जाब विचारला. यावेळी शुभांगीने सासऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. यावेळी दोघात मोठा वाद झाला. राग आल्याने पांडुरंग यांनी खोलीत पडलेला कोयता उचलून सुनेच्या हातावर वार केला. त्यानंतर डोके, पोटात, पायावर, पाठीवर असे 27 सपासप वार केले. यात शुभांगी गंभीर जखमी होऊन खाली पडली. मुले मयुरेश व तनिष्का आईला मारू नका असे सांगण्यास आल्यानंतर संतापलेल्या पांडुरंग यांनी नातवंडाच्या पायावर डोक्यात वार केले. यात नातवंडे सुद्धा जखमी झाले.

 

 

हल्ला झाल्यानंतर शुभांगी आणि मुले मोठयाने ओरडत होती. त्यामुळे शेजारी जमा झाली. त्यांनी जखमी शुभांगी आणि दोन्ही मुलांना खासगी वाहनातून तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्याची माहिती मिळताच रमेश सातपुते घरात आले. वडीलांनी केलेल्या या हल्ल्यात पत्नी, नातवंडे गंभीर जखमी झाल्याचे समजल्यावर रमेश यांनी वडील पांडुरंग यांच्यावर काठीने हल्ला केला. यात वडील पांडुरंग सुद्धा जखमी झाले. छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात गंभीर जखमी शुभांगी यांच्यावर उपचार सुरु होते.

 

 

मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मयुरेश आणि  तनिष्क यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयित पांडुरंग दशरथ सातपुते आणि त्यांची पत्नी शांताबाई अशा दोघांवर कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई तपास करीत आहेत.

 

 

नव्या वास्तूत सुनेच्या रक्ताचा पडला सडा

दरम्यान  सातपुते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी त्यांनी दुमजली घर बांधले आहे. नुकतीच नव्या वास्तूची वास्तूशांती करून ते या वास्तूत राहण्यास आले आहेत. याच घरात झालेल्या हल्ल्यात शुभांगीच्या रत्क्ताचा सडा पडला. 

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...