आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवज्याेत अाणताना टेम्पाेला अपघात; पाच तरुणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर/ सांगली - शिवजयंतीनिमित्त पन्हाळा गडावरून सांगलीकडे शिवज्याेत घेऊन जाणाऱ्या शिवप्रेमींच्या टेम्पाेला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पाच तरुणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. पुणे-बंगळुरू महामार्गावरील नागाव फाट्याजवळ साेमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. मृत सर्व जण सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये शिकत हाेते. अरुण बोंडणे (२०), केतन खोचे (२३), सुमीत कुलकर्णी (२०), सुशांत पाटील (१८) व प्रवीण त्रिकोटकर (१९) अशी त्यांची नावे आहेत. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या तरुणांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त केला. तसेच राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदतही जाहीर केली. वालचंद महाविद्यालयाचे काही विद्यार्थी शिवज्याेत अाणण्यासाठी रविवारी एका टेम्पाेमधून पन्हाळा गडावर गेले हाेते. तेथून रात्री परतत असताना काेल्हापूरजवळील शिराेली एमअायडीसीपासून काही अंतरावर काही वेळ त्यांचा टेम्पाे   थांबला हाेता. त्याच वेळी पुण्याहून बेळगावकडे जाणाऱ्या दुसऱ्या अज्ञात वाहनाने या टेम्पाेला पाठीमागून जाेराची धडक दिली. यामुळे टेम्पाे उलटून त्याखाली दबून पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...