आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 कोटींच्या 'त्या' नोटांसाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार-जिल्हा बँक अध्यक्ष मुश्रीफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर-  नोटाबंदी मुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटांपैकी शिल्लक असलेल्या 25 कोटीच्या जुन्या नोटा स्विकारण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने बँकेला मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य शेतकरी सभासदांवर पडणार असल्‍याने याबात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  भेट घेणार असून सकारात्‍मक निर्णय न झाल्‍यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


यावेळी ते म्हणाले की, 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटा बंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्हा बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटा स्वीकारू नयेत असे आदेश काढले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर या नोटा स्वीकारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पुढील चार दिवसाच्या नोटा स्वीकारल्या गेल्या पण प्रत्यक्ष 8 तारखे दिवशी जमा झालेल्या नोटा अद्याप स्वीकारलेल्या नाहीत. याचा फटका सर्वच जिल्हा बँकांना बसत असून या निर्णयामुळे सरकारने जिल्हा बँका संपवण्याचा घाट घातला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या कष्टाचा हा पैसा घेतला जात नाही आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेने भरलेल्या करातील पैसा मोठमोठ्या बँकांना लाखो कोटी रुपये बुडीत कर्जासाठी अनुदान म्हणून दिले जातात.यामुळेच यावर्षी इतिहासात प्रथमच स्टेट बँकेला मोठ्याप्रमाणावर तोटा झाला आहे हे सरकारने लक्षात घ्यावे.जिल्हा बँकेतील शिल्लक जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन अर्थमंत्री पंतप्रधान यांची भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगणार आणि यातून सकारात्मक निर्णय न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...