आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटा रिपोर्ट देणे पडले महागात, डाॅक्टरसह पाच जणांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- क-हाडमधील एका डाॅक्टरसह पाच जणांना पॅथाॅलाॅजीस्टचा खोटा रिपोर्ट देवून फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक दोन हजार अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. फौजदारी न्यायाधीश टी. आर. गोगले यांनी आज ठोठावली आहे. नेमके काय आहे प्रकरण.....

 

परभणी येथे राहणारे संजय गायकवाड कामानिमित्त 6 फेब्रुवारी 2012 रोजी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी त्यांना लघवीचा त्रास होत होता. गायकवाड यांनी लाईफलाईन लॅबमध्ये तपासणीसाठी नमुना दिला होता. त्यावेळी त्यांना पॅथॉलॉजिस्ट नसतानाही रिपोर्ट देण्यात आले. रिपोर्टवर डॉ.एम.बी पवार यांचे नाव असल्याने त्यांनी डाॅक्टरांनी भेटण्याची विनंती केली असता डाॅक्टर तेथे प्रत्यक्ष उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शंका आली म्हणून त्यांनी दुसऱ्या लॅबमधून लघवी तपासणी केली त्यावेळी त्यांच्या रिपोर्टमध्ये फरक जाणवला. 

 

गायकवाड यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरु केला मात्र डॉ. पवार यांना वगळून दोषारोपत्र दाखल केले. त्यावेळी आक्षेप घेत गायकवाड यांनी फेरतापसाची मागणी केली. त्यावेळी तत्कालीन पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी त्याचा फेर तपास केला. त्यावेळी त्यांनी पुरवणी दोषारोपपत्रात डॉ. पवार यांच्यासह पाचजणांवर गु्न्हा दाखल केला. साक्ष व वकीलांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरून पॅथॉलॉजिस्ट डॉ.एम.बी.पवार, जितेंद्र शिबे, नारायण चव्हाण, दीपक काळे व शशांक हर्डीकर यांना फसवणुकीबद्दल शिक्षा सुनावण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...