आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुर महापालिकेचा वीजपुरवठा महावितरणने केला खंडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पंचगंगा नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा कारणावरून आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महावितरण कंपनीच्या सहकार्याने कोल्हापूर महापालिकेचा वीज पुरवठा सकाळी 11.30 ते 12.30 यावेळेत खंडित केला. त्यामुळे कोल्हापूर मनपाची अब्रू वेशीवर आली.

 


याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर शहरातील एकूण 12 नाल्यांमधून शहराचे मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते, याबाबत विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करून आवाज उठवला आहे.तरीही या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता डोळेझाक करणाऱ्या कोल्हापूर मनपाला दोषी मानून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला पंचगंगा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी अपयशी ठरल्याने कोल्हापूर मनपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र वीज वितरण कंपनीने कारवाई केली नव्हती, आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीचे अधिकारी जितेंद्र सोनवणे यांना या प्रश्नी धारेवर धरत जाब विचारला. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्यात आली आणि मनपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईची चर्चा महापालिका चौकात आणि संपूर्ण कोल्हापूर शहरात दिवसभर सुरू होती.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...