आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढलेल्या बेरोजगारी विरोधात कोल्‍हापुरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा एल्गार मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. मात्र सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण होऊनही केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली नाही, या विरोधात आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने कोल्हापुरात एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.


भाजप सरकारच्या काळात नोटबंदीमुळे देशभरातील ४१ लाख तरुणांना आपल्या नोकऱ्या  गमवाव्या लागल्या. देशाचा विकासदर घटला आहे. तसेच पेट्रोल-डीझेल आणि घरगुती गॅस दरात भरमसाठ वाढ झाल्याने जनता हैराण झाली आहे.सरकारच्या या सर्व धोरण विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्य भर जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. एक लाख बेरोजगार तरुणांचा विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येईल तसेच आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना मागण्याचे निवेदन देणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनी सांगितले.


यावेळी प्रदेशाध्यक्ष नावेद मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने या सरकारच्या विरोधात रान पेटवावे यासाठी आता आगामी काळात अजितदादा पवार आणि खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी आक्रमक आंदोलन करू. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, उपमहापौर सुनील पाटील,शहरअध्यक्ष राजेश लाटकर,अनिल साळोखे,आदिल फरास,रोहित पाटील,प्रसाद उगवे,संगीता खाडे,कल्पेश चौगले,रविराज सोनुले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो....

बातम्या आणखी आहेत...