आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर जिल्हयातील 48 हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यात 115 कोटींची कर्जमाफीची रक्कम जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील  कर्जमाफी अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीकृत बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत 48 हजार 407 शेतकऱ्यांना 115 कोटी 61 लाख 87 हजार 282 रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 15 हजार 905 शेतकरी कर्जमाफी अंतर्गत तर 32 हजार 502 शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे आहेत. राज्य शासनाच्या  कर्जमाफी योजनेच्या निकषांना पात्र असणारा एकही शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी आज येथे दिली.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारणत: 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम शासनाने बँकाकडे वर्ग केली आहे. या योजनेंतर्गत राज्यात 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून छाननी अंतर्गत डुप्लीकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकाकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरीत केला आहे.जे शेतकरी पात्र होते,पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत समावून घेण्यात येणार असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. 

 


कर्जमाफीच्या कामास सहकार विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम युध्दपातळीवर केले जात आहे असे सांगून, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाही गतीमान केली आहे.कोल्हापूर जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होत असून, आतापर्यंत  जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून 48 हजार 407 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ दिला आहे. यामध्ये 15 हजार 905 शेतकऱ्यांना 63 कोटी 13 लाख 92 हजार 361 रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, 32 हजार 502 शेतकऱ्यांना 52 कोटी 47 लाख 94 हजार 921 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. याशिवाय  जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील यादीनुसार 37 हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून सुमारे 57 कोटी रुपये लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे, या कामास सहकार विभागाने प्राधान्य दिले आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत, वाणिज्यिक बँका, खासगी तसेच ग्रामीण बँकांकडील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही कर्जमाफीची रक्कम प्राधान्यक्रमाने जमा करण्याच्या कामासही गती मिळाली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...