आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक न आणल्याने मिळाली अशी शिक्षा, अजुनही थरथर कापतात विद्यार्थिनीचे पाय पाहा VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात विद्यार्थिनीवर उपचार सुरु आहेत. - Divya Marathi
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात विद्यार्थिनीवर उपचार सुरु आहेत.

कोल्हापूर - पुस्तक न आणल्याने 500 उठाबशांची शिक्षा केल्याने एका विद्यार्थिनीच्या पायाला सूज आल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थिनीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर चंदगडचे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी तर या मुख्याध्यापिकेचे निलंबन झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे ठणकावले आहे. जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखण्याचे आदेशही दिले आहेत.

 

नेहमी थरथर कापतात विद्यार्थीनीचे पाय
- कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कनूर बुद्रुक गावातील दिनेश्वरी संदेश विद्यालयात ही घटना घडली आहे.
- ही विद्यार्थिनी इयत्ता आठवीत शिकत आहे. ती हिंदीचे पुस्तक आणण्यास विसरली होती. त्यामुळे मुख्याध्यापिका अश्विनी अशोक दीवान यांनी तिला कार्यालयात बोलवले.

- आरोप आहे की, अश्विनीला कार्यालयाच्या बाहेर उभे करण्यात आले होते आणि तिला उठा-बशा काढण्यास सांगण्यात आले. तिने तिला त्रास होत असल्याचे सांगितले तरी तिला शिक्षा करण्यात आली.

- या शिक्षेमुळे तिला उभेही राहता येत नव्हते. तिचे हात-पाय थरथर कापत होते. डॉक्टरांनी तिला मोठा मानसिक व शारिरिक धक्का बसला असल्याचे सांगितले असून ती पुर्वस्थितीत येण्यास बराच मोठा कालावधी लागेल असे सांगितले आहे. 

-  300 उठाबशा काढल्यावर या विद्यर्थिनीचे पाय लटपटू लागले आणि पायात कळा येऊ लागल्या.तशाही स्थितीत ती विद्यार्थिनी कालगोंड वाडी येथील शाळेपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या घरी चालत गेली.तिला अतोनात त्रास जाणवू लागला त्यामुळे तिला गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.आता तीन दिवसांपासून त्या विद्यर्थिनीला कोल्हापूर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा मारहाणीमुळे जखमी विद्यार्थीनीचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...