आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात फटाक्याच्या कारखाण्यात भीषण स्फोट; कामगाराचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पेठ वडगाव येथील शिकलगार फटाका कंपनीत‍ गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात  दुर्घटनेत प्रकाश शिवराम सावंत (वय 55) यांचा मृत्यु झाला, तर शिवाजी धोंडीराम दबड़े (वय 65) हे गंभीर जखमी झाले. हे दोघेही पेठवडगाव येथील सिद्धार्थ नगरमधील रहिवासी आहेत.

 

सू‍त्रांनूसार, पेठवडगाव–भादोली रस्त्यावर, हमीद दस्तगीर शिकलगार यांची शिकलगार फटाके कंपनी आहे. या कंपनीमध्ये एकूण 5 कामगार काम करतात. आज सकाळी 9 वाजता इतर कामगारांसोबतच प्रकाश सावंत आणि शिवाजी दबडे हे दोघे कामावर आले. त्यांच्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर नळकांड्यामध्ये फटाक्याची दारू भरताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्रकाश सावंत यांचा  जागीच मृत्यू झाला. जखमी शिवाजी धोंडीराम दबडे यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालक दस्तगीर शिकलगार कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचा मुलगा कारखाण्यातच होता. स्फोटाच्या मोठ्या आवजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पेठवडगाव पोलिस करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...