Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Controversy By Chandrakant Patils Kannada Song

चंद्रकांत पाटलांच्या कानडी गाण्यावरून वाद..कोल्हापुरात मराठी युवा मंचच्या कार्यकर्त्यांना अटक

प्रतिनिधी | Update - Jan 23, 2018, 09:01 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्या कर्नाटकातील वक्तव्याचा सीमाभागातील कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला आहे. सीमा बांधव आणि बेळगा

 • Controversy By Chandrakant Patils Kannada Song

  कोल्हापूर- चंद्रकांत पाटील यांच्या कर्नाटकातील वक्तव्याचा सीमाभागातील कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सीमा बांधव आणि बेळगावमधील मराठी युवा मंचचे संतप्त कार्यकर्त्ये आज (मंगळवार) संभाजीनगर परिसरात असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहे. परंतु, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून निवासस्थानापासून 100 फुटावरच अडवण्यात आले आहे.

  बेळगाव,निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन सीमा भागातून आलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थाना जवळचा परिसर दणाणून सोडला. आम्हाला फक्त 5 मिनिटे चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाजवळ जाऊन निदर्शने करू द्या, अशी वारंवार विनंती या कार्यकर्त्यांनी केली. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरले. ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली व नंतर सोडून दिले.

  महाराष्‍ट्रातील पोलिसांकडून वाईट वागणूक...

  कर्नाटकातील पोलिसांपेक्षा महाराष्ट्र पोलिसांकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थाच्या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

  आमच्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाले आहेत. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून
  40 लाख जनतेच्या भावना यांनी दुखावल्या आहे, त्याचा आम्ही शांततेत निषेध करत आहे, असे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधलेल्या सीमाभागातील कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

  108 हुतात्म्यांची शपथ घेतो...

  सीमाभागातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानापासून 100 फुटावर अडवले. आम्हाला चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर जाऊ द्या. आम्ही 108 हुतात्म्यांची शपथ घेतो. आम्ही कुठलाही अनुचित प्रकार करणार नाही, असे कार्यकर्ते पोलिसांना सांगत आहेत. खुद्द पोलिस अधीक्षक संजय मोहिते हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

  चंद्रकांत पाटील राजीनामा द्या...

  'बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशा संतप्त कार्यकर्ते घोषणा देत आहेत. गेल्या 5 वर्षांत आम्ही दगड हातात घेतला नाही. आज आम्ही फक्त आमच्या भावना महाराष्ट्रातील जनतेला कळाव्यात म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करणार आहोत. आम्हाला पाच मिनिटांचा वेळ द्या, अशी मागणी मराठी युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी संजय मोहिते यांना केली आहे. मराठी युवा मंच अध्यक्ष सुरज कबणरकर, माजी महापौर सरिता पाटील, मदन बामणे, पियुष हावळ, रेणू किल्लेदार, सुनील बाळेकुंद्री, प्रसाद पोवार या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

  दरम्यान, कर्नाटक राज्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावात दुर्गा मंदिराच्या उद्‍घाटनासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी कन्नड भाषेतून 'जन्मावे तर कर्नाटकात' या अर्थाचे गाणे गायिले होते. त्यामुळे सीमा बांधव आणि बेळगाव मधील मराठी युवा मंचचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापुरच्या दिशेने बेळगावातील तरुण रवाना झाले आहेत.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...चंद्रकांत पाटील यांच्या कानडी गाण्यावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ आणि फोटो...

Trending