आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारले, अध्यक्षांच्या घरावर फोडले फटाके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- नुकत्याच झालेल्या कर्नाटक ‍विधानसभा निवडणूक झाली. त्यात बेळगावच्या मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला स्पष्‍ट नाकारले. महाराष्‍ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. भाजपचे उमेदवार अभय पाटील यांच्या समर्थकांनी एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक करून फटाके फोडले. या प्रकारामुळे सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.

 

सुदैवाने कोणतीही दुखापत नाही..

घरावर फटाके फोडण्यात आले तेव्हा किरण ठाकूर घरात नव्हते. त्यामुळे ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.

 

दरम्यान, बेळगावात मराठी जनतेत पडलेली फूट महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुळावर उठली. कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून अाला नाही. 

 

18 उमेदवारांपैकी एकही उमेदवारांला यश नाही..

कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान झाले. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 76  टक्के मतदान पार पडले. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही.

 

पुढील स्लाइढ्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...