आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इचलकरंजी नगरपालिकेत कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- इचलकरंजी नगरपालिकेतील अकाउंट विभागात एका कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. चांद समडोळे असे या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. चांद समडोळे यांनी कर्जबाजारपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे.


सूत्रांनुसार,
चांद समडोळे यांच्या डोक्यावर जवळपास 14 ते 15 लाखांचे कर्ज होते. त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. सावकार त्यांच्याकडे सारखा तगादा लावत होता. मागील दोन दिवसांपासून चांद समडोळे बेपत्ता होते. सकाळी नगरपालिका कार्यालय उघडले असता अकाउंट विभागात छताला असलेल्या पंख्याला त्यांची मृतदेह लटकल्याचे आढळून आले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्‍यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...