आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • काय सांगता पंचगंगा नदी चोरीला गेली...हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल Panchganga River Stolen Villagers Complaint To Hatkanangale Police Station

काय सांगताऽऽ पंचगंगा नदी चोरीला गेली...हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- गेल्या 20 वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली कोल्हापुरातील पंचगंगा नदी आज चक्क चोरीला गेली आहे. शंभरहून अधिक जणांनी आज (सोमवारी हातकणंगले पोलिस ठाण्यात धाव घेऊन कोल्हापुरातील पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिस सुद्धा आवाक् झाले आहेत.

 
सकाळी शंभरहून अधिक लोक मासे पकडण्याचे जाळे आणि हलगी घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाले. या सर्वांनी पंचगंगा नदी चोरीला गेल्याच्या वैयक्तिक लेखी तक्रारी पोलिसांना दिल्या आहेत. या तक्रारीमध्ये आम्ही सकाळी नदीवर गेलो. पण त्याठिकाणी नदीच अस्तित्वात नाही. पंचगंगा नदी चोरीला गेली असून नदी चोरणाऱ्यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करा, असे या तक्रारीत तक्रारदारांनी म्हटले आहे.

 

नदी चोरीला गेल्याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. दरम्यान, गेल्या वीस वर्षांपासून नदीमध्ये प्रदूषण झाले आहे. या नदीत जलपर्णी वाढल्या असून प्रदूषणामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. मोठा पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी पंपिग स्टेशन बंद पडते. मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळते. जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे-मोठे नाले नदीत मिसळतात. जयंती नाल्याचे पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. हा अपवाद वगळता पंचगंगा नदीने प्रदूषणाचे टोक गाठले आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही थातूरमातूर कारवाईनंतर नदीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता हीच पंचगंगा नदी प्रमाणाच्या बाहेर दूषित झाल्याने  हातकणंगले मधील स्थानिक  नागरिकांनी पोलिस ठाण्यात नदीच चोरीला गेल्याची तक्रार केली आहे.याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...