आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या सराफ्याला कोल्हापूरात लूटले; पिस्तूलाचा धाक दाखवून लांबवले 1KG सोन्याचे दागिने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करून पाच लुटारूंनी त्याच्याजवळील 1 किलो सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली. कांतीलाल जसवंतराज मेहता (वय-53) असे मुंबईच्या सराफाचे नाव आहे. ही घटना आज (बुधवार) घटली. या घटनेने कोल्हापूर पोलिसही अक्षरशः चक्रावले आहेत.

 

गुजरी कॉर्नर ते रंकाळा स्टँड या मार्गावर आठवड्यातील हा थरार घडला. आजच्या या खळबळजनक प्रकारात लुटारूंनी सुमारे 1 किलो सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खळबडून जागी झाली आहे. मारुढर भवन येथील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. मोटारीतून आलेल्या या लुटारुंचा शोध  घेण्यासाठी पोलिसांचे सात पथके रवाना झाली आहेत.

 

दरम्यान, कावळा नाका परिसरातील राजेश मोटर्सजवळ अवघ्या चारच दिवसापूर्वीच दोन वृद्ध इस्टेट एजंटच्या डोळ्यात चटणी टाकून, त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करून तब्बल 17 लाखांची रक्कम चौघांनी लुटली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.... सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली घटना...

बातम्या आणखी आहेत...