आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात; सीटबेल्टमुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी सुखरुप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर/मुंबई- शिवसेनेचे प्रवक्ता आणि अभिनेता आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात झाला आहे. सुदैवाने बांदेकरांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.

 

सूत्रांनुसार, अादेश बांदेकर कारने कोल्हापुरच्या दिशेने जात असताना कराडजवळ हा अपघात झाला. सुदैवाने त्यांना काहीही झालेले नाही. ते सुखरुप आहेत.

 

गाड्या एकमेकांवर आदळल्या..

कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. टायर फुटताच गाड्या एकमेकांवर आदळल्या. आदेश बांदेकर यांनी सीटबेल्ट लावला होता. त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी बांदेकरांच्या कारमध्ये सिद्धिविनायक मंदिराचे इतर विश्वस्तही होते.

 

सिद्धिविनायकाची कृपेने मी सुखरुप...

आदेश बांदेकर हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तसेच ते शिवसेनेचे प्रवक्तेही आहेत.  सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने एक कोटींचा धनादेश कोल्हापुरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवण्यासाठी ते निघाले होते. सिद्धिविनायकाच्या कृपेने माझ्यासह सर्व सहकारी सुखरुप असल्याची भावना बांदेकरांनी व्यक्त केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... आदेश बांदेकर यांच्या कारला झालेल्या अपघाताचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...