आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kolhapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना उचगाव येथील जानकी नगरात बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. विद्या शिवाजी ठोंबरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. खून करून पतीनेही स्वतःच्या गळ्यावर विळ्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

जखमी पती शिवाजी प्रभाकर ठोंबरे (40) याला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत विद्याचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (रा.कुर्डुवाडी, जि.सोलापूर) याने गांधीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाच महिन्यांपूर्वी विद्या हिच्याशी शिवाजी प्रभाकर ठोंबरे यांचे लग्न झाले होते. पण पती शिवाजी तिच्यावर संशय घेत होता. मयत विद्या हिचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (वय- 24) हा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. पत्नी माहेरी जाणार या विचाराने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. नंतर शिवाजी याने स्वतःचा गळा विळ्याने चिरून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 

जखमी पती शिवाजी ठोंबरे याला छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस.पांचाळ करत आहेत.

 

पहिल्या पत्नीचीही हत्या...
शिवाजी ठोंबरे यांनी पहिल्या पत्नीचीही हत्या केली होती. 2014 मद्ये शिवाजीने पहिल्या पत्नीची संशयावरून डोक्यात गॅस सिलिंडर मारून हत्या केली होती. परंतु पुराव्या अभावी 2017 मध्ये या त्याची निर्दोष सुटका झाल्याची मा‍हिती गांधीनगर पोलिसांनी दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...