आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात करवीर दर्शन बससेवा; पर्यटकांना पाहता येणार दक्षिण काशीतील रम्य ठिकाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत ( केएमटी ) उद्या मंगळवारी 12 डिसेंबर पासून पर्यटकांसाठी कोल्हापूर शहरात करवीर दर्शन बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेचा शुभारंभ कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांच्या हस्ते करण्यात होणार आहे, अशी माहिती मनपा परिवहन सभापती नियाज खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.


कोल्हापूरची ओळख दक्षिण काशी म्हणून आहे.या शहरात साडेतीन शक्तीपीठापैकी एक संपुर्ण शक्तीपीठ असलेले अंबाबाई मंदिर आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून कोल्हापुरात पर्यटक येतात.कोकण, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेले पर्यटक मुक्कामी असतात. या पर्यटकांना इथल्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेता यावे यासाठी ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
दररोज सकाळी दसरा चौकातून 10 वाजता ही बस सुटणार आहे.आणि सायंकाळी 6 वाजता रंकाळा तलाव आणि गार्डन या ठिकाणी पर्यटकांना सोडण्यात येणार आहे. यासाठी प्रौढ व्यक्तीस 175  रुपये आणि लहान 12 वर्षांखालील मुलांना 90 रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले आहे.


या बससेवेचा लाभ पर्यटकानी घ्यावा असे आवाहन यावेळी नियाज खान यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, सदस्य शेखर कुसाळे,विजयसिंह खाडे-पाटील, सयाजी आळवेकर उपस्थित होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...