आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात CONG-NCP ची सत्ता, BJP च्या मदतीने \'स्थायी\'च्या सभापतीपदी \'ताराराणी\'चे ढवळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे. - Divya Marathi
ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे.

कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला पराभवाचा धक्का देण्यात आला आहे. विरोधी भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे यांनी अनपेक्षितरित्या 9 मते मिळवत स्थायी समितीच्या सभापती पदावर बाजी मारल्याने विरोधकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तर राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांचा मात्र दोन मतांनी पराभव झाल्याने सत्ताधारी गटात निरव शांतता पसरली आहे. मेघा पाटील यांना 7 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारात आता नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

 

 

एकाच घरात किती पदे द्यायची या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण या दोन स्थायी समितीच्या सदस्यांनी पक्षादेश धुडकावून ताराराणी आघाडीच्या आशिष ढवळे यांना मतदान केले. त्यामुळे पुरेसे संख्याबळ असताना केवळ पक्षांतर्गत नाराजीमूळे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेत्यांनी डावलल्याने या दोघा नगरसेवकांनी विरोधी आघाडीच्या उमेदवाराला स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मतदान केल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात चांगलीच रंगली आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...