आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात कोयत्याने वार करून वृद्धाचे 20 लाख लुटले; डोळ्यात चटणी फेकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर– भर दिवसा येथील ताराराणी चौकात दोघा वृद्धांच्या हातावर कोयत्याने वार करून डोळ्यात चटणी फेकून, तब्बल वीस लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. गजबजलेल्या चौकात ही घटना घडली. त्यामुळे आता कोल्हापूर शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारूदत आण्णा कोगे (70, रा चिंचवाड, ता.करवीर) आणि दिनकर बंडोपंत जाधव (65) हे दोघे वृद्ध जागेच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. एका जागेच्या खरेदी व्यवहारातील  20 लाखाची रक्कम घेऊन जात असता दुचाकीवरून अचानक समोर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून डोळ्यात चटणी फेकून 20 लाख रुपये हिसकावून नेले. चारूदत्त यांच्या हातावर कोयत्याने वार केले तर जाधव यांच्या डोळ्यात चटणी फेकून दोघां हल्लेखोरांनी रक्कम घेऊन पोबारा केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा वृद्धांवर प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...