आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात मुलीकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण; असा उघङकीस आला प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीने आपल्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. आरोपी तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

अल्पवयीन तरुणाच्या अंगावर जखमा आढळल्यामुळे आईने त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा सुरुवातीला त्याने ही बाब लपवली. अखेर आपले मानसिक, लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचे मुलाने सांगितले, असा दावा त्याच्या आईने केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली, मात्र अखेर बुधवारी रात्री गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणाऱ्या कलम 7, 8 अंतर्गत तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...