आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे हात कापले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर-  पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर कवठे महांकाळ-सलगरे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये खिडकीत बसलेल्या सुमारे डझनभर प्रवाशांचे हात धावत्या ट्रेनमध्ये कापले गेल्याची घटना घडली आहे. सर्व जखमी प्रवाशांना मिरजमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

कवठे महांकाळ-सलगरे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेमार्गाला खेटून असणारा एखादा मार्गदर्शक फलक किंवा खांबाचा पत्रा तुटून लटकत होता. यामुळे प्रवाशाचे हात कापले गेले. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला हा तुटलेला पत्रा घासत गेला, त्यामुळे रेल्वेच्या डब्यात खिडकीला टेकून बसलेल्या प्रवाशांचे हात क्षणात कापत गेले. अवघ्या मिनिटभरात डझनभर प्रवासी रक्तबंबाळ झाले.स्लिपर आणि जनरल डब्यातील प्रवासी प्रामुख्याने जखमी झाले. यामुळे गाडीत एकच गोंधळ सुरु झाला. तोपर्यंत गाडी मिरजेपर्यंत आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस व सुरक्षा दल, रेल्वेचे वैद्यकीय पथक मदतीला धावले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...