आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इचलकरंजीतील रुग्‍णालयात कुमारी मुलींची बेकायदेशीर प्रस्‍तूती करुण अर्भकाची विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्‍हापूर- कुमारी मुलींची बेकायदेशीर प्रस्‍तूती करूण जन्‍माला आलेल्‍या अर्भकाच्‍या विक्रीचा प्रकार इचलकरंजी येथील रुग्‍णलयाल समोर आला आहे. केंद्रीय दत्‍तक प्राधीकरण पथकाने मंगळवारी टाकलेल्‍या धाडीत हा धक्‍कादायक प्रकार उघड झाला. या प्रकारानंतर पथकाने रुग्‍णालयातील डॉक्‍टर अरूण पाटील, त्‍यांच्‍या पत्‍नी व रुग्‍णालयातील कर्मचा-यांना ताब्‍यात घेतले आहे.    


रुग्‍णालयामध्‍ये कुमारी मातांची प्रस्‍तूती करूण जन्‍माला आलेले बाळ दोन लाख रूपये देऊन विकत घेतले जात होते. त्‍यानंतर त्‍याबाळाची जास्‍त दराने विक्री केली जात असे. प्राथमिक तपासात छत्‍तीसगड व मुंबईमध्‍ये दोन बाळाला विकल्‍याचे उघड झाले आहे. 

 

नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकाने ही धाड टाकली. या नंतर डॉ. अरूण पाटील, त्‍यांच्‍या पत्‍नी व रुग्‍णालयातील कर्मचा-यांना ताब्‍यात घेऊन रुग्‍णालयातील सर्व कागतपत्रे जप्‍त केले. रात्री अशीरा पर्यंत शिवाजी नगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍याचे काम सुरू होते. 


हातकंगले तालूक्‍यातील कोरोची येथील संतोषीमाता अनाथलयवरही धाड टाकली यातही अनाथलयात बेकायदेशीर 14 मुले आढळून आले. याप्रकरणी येथील शहापूर पोलीसात गुन्हा दाखल केला जात आहे. यापूर्वी २००८, २००९ या साली धाड टाकली होती. 2009 साली 13 मुलांची पथकाने सुटका केली होती. तसेच एक दतक मुलाच्या नावाखाली एका मुलाची बेकायदेशिरपणे विक्री केल्याचा प्रकारही उघड झाला होता. आज परत या अनाथलयावर या पथकाने धाड टाकली.

बातम्या आणखी आहेत...