आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात संतप्त शिवसैनिकांनी छिंदम याच्या पुतळ्यास चप्पलांनी बदडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याचा निषेध करून शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात श्रीपाद छिंदम याच्या पुतळ्याला महिलांनी बदडून काढले तर शिवसैनिकांनी त्याच्या पुतळ्याचे दहन करून निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.
 
 
छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आणि शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप नेत्यांची मग्रुरी दिवसेंदिवस वाढत असून, सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा हा माज जनता लवकरच उतरवेल, पण छत्रपती शिवरायांचा अवमान शिवसेना खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेच्या “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भडव्या श्रीपाद छिंदमचा धिक्कार असो”, भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदमचे करायचे काय खाली डोके वर पाय, भाजप नेते हाय हाय, वीज दरवाढ लादणाऱ्या वीज महामंडळाचा धिक्कार असो अशा घोषणानी महावितरण कार्यालय परिसर दणाणून सोडला. 
 
 
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, निवडणुकीपुरते छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करायचा छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद.. चलो मोदी के साथ असा नारा द्यायचा, आणि निवडणुका झाल्या की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करायचा हे भाजपचे कुकर्म आहे. गेल्या तीन –चार वर्षामध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकांपासून प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या लाटेवरचे ओंडके असलेले भाजपचे काही लोकप्रतिनिधी आणि भाजपचा नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने केलेले विधान भाजपचा सत्तेचा माज दाखवते. अशा प्रवृत्तीला जागीच ठेचले पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये भाजप पक्षाच्या वाढीसाठी भाजपने समाजकंटकांना पक्षात स्थान दिले आहे. पक्षाची ताकद वाढल्याचे भासविण्यासाठी भाजपकडून समाजकंटकाना उपमहापौर अशा महत्वाच्या पदावर बसविले आहे. या समाजकंटकांच्या कडून युगपुरुषांचा अवमान होत असेल तर शिवसेना कदापि खपवून घेतला जाणार नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौऱ्याचे पोस्टर काढण्यासाठी  प्रभो शिवाजी राजा चित्रपटाचे पोस्टर काढून भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची आत्मीयता दाखवून दिली होती. या मग्रुरीला वेळीच लगाम घालावा अन्यथा महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशात भाजप पक्षाची वाताहत होईल. भाजपच्या नेत्यांकडून पुन्हा अशा प्रकारचे वक्तव्य झाल्यास शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. 
 
 
यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक मंगल साळोखे, पूजा भोर,  गीता भंडारी, गौरी माळतकर, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे, पूजा कामते, शाहीन काझी, दीपक गौड, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, विशाल देवकुळे, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, रमेश खाडे, दीपक चव्हाण, संजय गांधी योजनेचे किशोर घाटगे, सुनील खोत, अमित चव्हाण, राहुल चव्हाण, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश सरनाईक, फेरीवाले सेनेचे शहरप्रमुख धनाजी दळवी, पद्माकर कापसे, पानपट्टी सेनेचे अरुण सावंत, सुनील भोसले, निलेश गायकवाड, अश्विन शेळके, भाई जाधव, सनी अतिग्रे, मंदार तपकिरे, गजानन भुर्के, शाम जाधव, सुनील भोळे, सागर घोरपडे, युवा सेनेचे पियुष चव्हाण, चेतन शिंदे, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, विश्वदीप साळोखे, योगेश चौगुले, गुरु लाड, कपिल केसरकर, उदय भोसले, मुकुंद मोकाशी, प्रशांत नलवडे, आदी शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...