आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हापुरात अल्पवयीन मुलावर पोलिसाच्‍या मुलीकडून लैंगिक अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस पीडित मुलासोबत आरोपीसारखे वागत असल्याचा आरोप झाला. - Divya Marathi
पोलिस पीडित मुलासोबत आरोपीसारखे वागत असल्याचा आरोप झाला.

कोल्हापूर- मुलाकडून मुलीवर अत्याचार हाेत असल्याची अनेक प्रकरणे अापल्यासमाेर अालेली अाहेत. मात्र गेल्या सहा वर्षांपासून एका मुलावर मुलीकडूनच जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची विचित्र घटना कोल्हापुरात उघडकीस आली अाहे.  विशेष म्हणजे या प्रकरणातील मुलगा आणि अत्याचार करणारी मुलगी ही अल्पवयीन आहे. 


याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर संबंधित मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीचे वडील हे पोलिस दलात अधिकारी आहेत. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आरोपी मुलगी आई-वडिलांसोबत राहते. २०१२ मध्ये पीडित मुलगा कचरा गोळा करण्यासाठी आला होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली. त्यानंतर मुलीने कामानिमित्त मुलाला घरी  बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलाने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगिल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात मुलीविरोधात तक्रार दिली.  त्यानंतर मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण

- कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क या उच्चभ्रू वस्तीत राहणारे निलंबित करण्यात पोलिस उपअधीक्षक मधुकर शिंदे यांच्या घरात घरकामासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार झाल्याची तक्रार चाइल्ड लाइनच्या समुपदेशकांनी बाल कल्याण संकुलात 1 फेब्रुवारी रोजी केली होती. 
- तब्बल 20 दिवसांनी म्हणजे बुधवारी 21 फेब्रुवारीला बालकल्याण संकुलात ठेवलेल्या मुलावर  वैद्यकीय उपचारा दरम्यान त्याला असहाय्य वेदना सुरु होत्या. मुलाला होत असणाऱ्या वेदना पाहून बाल कल्याण संकुलातील अधिकारी अश्विनी अरुण गुजर यांनी अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी रितसर फिर्याद दाखल केली.  

 

पाच वर्षे अल्पवयीन मुलाला जनावराप्रमाणे वागवले, सर्वांगावर चटके 
- या फिर्यादीनुसार पोलिसांनी निलंबित  पोलीस उपअधीक्षक मधुकर शिंदे यांच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला आहे.

- शिंदे यांच्या मुलीने पीडित मुलास जिन्यावरून ढकलून दिले. मारहाण करून हात आणि पायावर चटके दिले. इतकेच नव्हे तर माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करत त्या मुलाच्या गुप्तांगावरही चटके दिले आहेत, असा  उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

- हा मुलगा तब्बल पाच वर्षे दत्तक घेण्याच्या प्रक्रियेविना मधुकर शिंदे यांच्याकडे राहात होता. मात्र त्या मुलाला जनावरां प्रमाणे राबवून घेण्यात येत होते असा आरोप करण्यात येत आहे.

- या प्रकाराची माहिती चाइल्ड लाइनच्या समुपदेशकांना मिळाल्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या घरातून पीडित मुलाची सुटका केली. यानंतर त्याला बाल कल्याण संकुलात दाखल केले.

 

समुपदेशकास धमकी

-  शिंदे कुटुंबाविरोधात तक्रार देणाऱ्या समुपदेशकास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत समुपदेशक शिवाजी माळी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. बाल कल्याण संकुलातील अधिकाऱ्यांनी पीडित मुलाच्या वयाची पडताळणी करण्यासाठी सीपीआरमध्ये वैद्यकीय चाचणी केली असता, पीडित मुलगा 14 ते 16 वर्षे वयाचा असल्याचे
स्पष्ट झाले आहे.

- त्याचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा वैद्यकीय अहवाल देण्यात आला आहे. यानंतरच मधुकर शिंदे यांच्या अल्पवयीन मुलीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाहूपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

आरोपी मुलीचे पोलिसांना उद्धट उत्तर
- पोलिसांनी तपासादरम्यान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावल्यानंतर आरोपी मुलीने शाहूपुरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याना सुद्धा उद्धट उत्तरे दिल्याचे समझते.

- दरम्यान पीडित मुलास बेकायदेशीरपणे घरात ठेवण्यात निलंबित उपअधीक्षक शिंदे यांचा पुढाकार होता. कायद्याची माहिती असूनही त्यांनी कोणतीही दत्तक प्रक्रिया न करता मुलाला घरात ठेवले.हा गंभीर गुन्हा असूनही फिर्यादीत त्यांचे नाव नाही. याशिवाय शिंदे यांची पत्नी आणि दुसरी मुलगी या दोघींनी देखील छळ केल्याचे पीडित मुलाने सांगितले आहे.

- पोलिसांनी केवळ अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करून कायद्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

पीडित मुलालाच पोलिस आरोपीसारखे वागत होते... 
- गुरुवारी सायंकाळी या मुलाला पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी काही वृत्त वाहिन्यांच्या कॅमेरामननी त्याचे छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलाला घेऊन आलेल्या पोलिसांनी अक्षरशः या कॅमेरामन ना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.

- तसेच या अल्पवयीन मुलाला सुद्धा फरफटत नेऊन पोलीस व्हॅन मध्ये कोंबण्यात आल्याचे चित्रण झाले आहे, असे या कॅमेरामननी सांगितले.

- पीडित मुलाला पोलिसांनी शालीत गुंडाळून रुग्णालयात आणले होते, जणू काही तोच आरोपी आहे असे वर्तन पोलिस त्याच्यासोबत करत होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...