आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंनी घेतला छिंदम यांच्या वक्तव्याच्या समाचार; म्हणाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर/सातारा/पुणे- श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याचा आज खासदार उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला. ‘कोणत्याही व्यक्तीने बोलण्यापूर्वी आपली वैचारिक उंची, पात्रता पाहावी. आपण कोणाबद्दल बोलतोय, याचा विचार केला पाहिजे. श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून कुप्रवृत्तीचे प्रदर्शन केले,’ असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा पुरुष जन्माला यायला युगाचा कालावधी लागत असावा. इतके महान कर्तृत्व युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. जातीपातीचा भेदभाव न ठेवता, सर्व जातीधर्माला समान न्याय देत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारणी केली. त्याकरिता त्यांनी असिम त्याग केला. राज्यकर्ता कसा असावा, जनतेप्रती त्याचे उत्तरदायित्व काय असावे, वंचितांना मुख्य प्रवाहात कसे आणावे, शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने, त्याच्याबाबत कशी निती असावी, न्यायदान कसे असावे, महिला-भगिनींविषयी राज्यकर्त्यांचे काय धोरण असावे, युद्धनिती कशी असावी, गनिमी कावा केव्हा राबवावा? आदी प्रश्नांवर छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवून दिलेली शिवनिती जगात सर्वश्रेष्ठ आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...