आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पवार साहेब, माझं कधी चुकत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने सांगत जा...\'-उदयनराजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
...तर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला दगड   ^हा हल्ला व्यक्तिद्वेषातून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील. शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असताना कोणी सरकारचे गुणगान गात असेल तर अशा मंत्र्याचे स्वागत कसे करायचे?   राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. - Divya Marathi
...तर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला दगड ^हा हल्ला व्यक्तिद्वेषातून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील. शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असताना कोणी सरकारचे गुणगान गात असेल तर अशा मंत्र्याचे स्वागत कसे करायचे? राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

सातारा- छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार व अापल्या बेधडक वागणुकीने देशभर परिचित असलेले उदयनराजे भाेसले शनिवारी प्रथमच गहिवरलेले दिसले. त्यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे अाैचित्य साधून अायाेजित सत्कार साेहळ्यात मुख्यमंत्र्यांसह सर्वच मान्यवरांनी राजेंचे काैतुक केेले. पक्षाध्यक्ष शरद पवारांशी उदयनराजेंचे फारसे सख्य नव्हते, मात्र अाज जेव्हा त्याच पवारांनी राजेंबद्दल जाहीर गाैरवाेद‌्गार काढले तेव्हा मात्र ते भावनावश झाले. ‘माझं कधी काही चुकत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने आवर्जून सांगत जा. तुमच्या भावनेचा आणि प्रेमाचा कधी अवमान होणार नाही,’ अशी ग्वाहीच उदयनराजेंनी पवारांना दिली.  


या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभुराज देसाई, आमदार जयकुमार गोरे अशी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती हाेती. मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक अामदार व राजेंचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही अामदारांनी मात्र कार्यक्रमावर बहिष्कार घातला हाेता.   


मुख्यमंत्री म्हणाले, ‘उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी ते आमच्यासाठी एखाद्या मुक्त विद्यापीठाप्रमाणे आहेत. जे त्यांच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना राजे स्वत:च शासन करतात. दुसरीकडे, मित्रांचा मित्र, प्रेमाला प्रेम देणारा व अन्यायाविरुद्ध तमा न बाळगता आवाज उठवणारी व्यक्ती म्हणून राजेंची अाेळख अाहे.  छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो.’  


पवार म्हणाले ‘उदयनराजेंविषयी सर्वच खासदारांना  कायम उत्सुकता असते. ते संसदेत कमी बोलत असले तरी बोलतात तेव्हा महाराष्ट्राच्या व साताऱ्याच्या विकासाबद्दल बाेलतात. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असून भविष्यातही आम्हा सर्वांची साथ तुम्हाला असेल,’ असे सूचक विधान करत पवारांनी राजेंशी पक्षात असलेली कटुता दूर झाल्याचे संकेत दिले.

 

इतकी स्तुती एेकून ‘डायबिटीस’ हाेईल
सत्काराला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले,‘अाज सर्वांनी माझी इतकी स्तुती केली अाहे की बाजूला कुणी हरभऱ्याचं झाड लावलंय असं वाटत हाेतं.एवढं कौतुक ऐकून डायबिटीस होईल, असं वाटत होतं.... तुमच्या या कौतुकामुळे आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा आणि ताकद मिळत मिळते,’ असे सांगत उदयनराजेंनी नम्रपणे सत्काराचा स्वीकार केला.

 

मुख्यमंत्र्यांनी मारली राजेंना मिठी  
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासमक्ष उदयनराजेंना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. राजेंनी केलेली अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची व साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयाची केलेली मागणी मान्य करून अापण त्यांच्या वाढदिवसाची भेट देत अाहाेत,’ अशी घाेषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...