आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: जेव्हा पवार म्हणतात, मामाच्या गावची मुलगी करायचं राहिलंच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर/पुणे- पश्चिम महाराष्ट्रात लग्नासाठी मामाच्या गावची पोरगी करण्याची पद्धत आहे. पण माझ्या नशिबात हा योग नाही, अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार शनिवारी (दि.10) कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावात बोलत होते. गोलिवडे हे पवारांचे आजोळ आहे. गावाच्या वतीने शरद पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शरद पवार हे भारावून गेले होते.

 

 

यावेळी अनेक आठवणींना पवारांनी उजाळा दिला. लहान असताना मामाच्या गावची मुलगी करण्याची इच्छा होती. कारण तशी पद्धत आहे. पण आता माझ्या नशिबात हा योग नाही. या गोष्टीला 50 वर्ष झाल्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. मामाच्या गावाला यायला खूप उशीर झाला आणि आता ते शक्यही नाही, असे पवार म्हणताच एकच हशा पिकला. 

 

 

पुढील स्लाईडवर जाणून घेऊ या पवारांचे काही अज्ञात पैलू

 

 

 

बातम्या आणखी आहेत...