आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर- तीन तलाक विधयेक मुस्लिम महिलांच्या अधिकारांवर गदा आणणारे विधेयक आहे. मुस्लिम महिला इस्लामच्या शरियत कायद्याच्या तरतुदीतच समाधानी आहेत. इस्लामच्या शरियत कायद्यात महिलांच्या अधिकारांचे पुरेपूर संरक्षण करण्यात आले आहे. तेव्हा मुस्लिम महिलांना तीन तलाख विधेयकाची काही आवश्यकता नाही व ते लवकरात लवकर रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मुस्लिम बोर्डिंग आणि मुस्लिम समाजातील महिलावर्गाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. येत्या 24 फेब्रुवारी पर्यंत या मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला.
मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवक निलोफर अजरेकर याविषयी बोलताना म्हणाल्या की, प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज ऍक्ट 2017 हा घाई गडबडीत घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय घेताना शासनाने मुस्लिम समाजातील कोणत्याही धर्मगुरू किंवा मुस्लिम बुद्धिजीवी वर्गाशी चर्चा केलेली नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर या विधेयकाची काहीच आवश्यकता नव्हती. हे विधयेक भारतीय संविधानाच्या व मुस्लिमांच्या विरुद्ध आहे. या विधेयकामूळे मुस्लिम महिला आणि मुलींच्या अधिकारांवर गदा येणार आहे. यावेळी डॉ.बिलकिश सय्यद, वहिदा बागवान, नजिया शेख, यास्मिन शेख, मिसबाह शेख, कासिफ शेख, सनोबर बागवान, अॅड. नदाफ, डॉ.सीमा मोडक, नौशीन खानापूर,यास्मिन पट्टणकुडी यांच्यासह मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचबरोबर मुस्लिम समाजातील विविध मशिदीतील धर्मगुरू, उलेमा,आणि मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, अधीक्षक साजिद खान, सर्व संचालक, समाजातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.