आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sangali- दहावीत मिळाले 53 टक्के मार्क्स, निराश विद्यार्थ्याने मित्रांना पेढे वाटून केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली-  शहरातील गजानन काॅलनीत राहणा-या दहावीतील एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी दुपारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला होता. त्यात त्याला 53 % गुण मिळाले होते. त्याने याबद्दल रात्री मिंत्राना पेढेही वाटले आणि नंतर घरी आपल्या खोलीत आत्महत्या केली. 

 

साहिल वडगू कोलवेकर वय 15 असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साहिल सायंकाळी मित्रांना पेढे वाटण्यासाठी गेला होता. रात्री घरी परत आल्यानंतर तो आपल्या बेडरूममध्ये गेला. परंतु तो बराच वेळ तो बाहेर न आल्याने घरच्या लोकांनी त्याच्या बेडरुमम बेडरूममध्ये पाहिले असता त्याने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे, त्याला लगेच शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. साहिलला परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...