आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: मलाबार गोल्डच्या 215 व्या दालनाचे बॉलिवूड स्टार अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- जगातील पाचव्या क्रमांकाचे ज्वेलरी रिटेलर असलेले मलाबार गोल्ड आणि डायमंड्स यांच्या 215 व्या शोरुमचे आज कोल्हापुरात बॉलीवूड स्टार अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या जल्लोषात झाले. यावेळी समुहाचे इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ.आशेर, रिजनल हेड एम.पी.सूबेर आणि विशेष निमंत्रितांसह मान्यवर उपस्थित होते.

 

सर्व वयोगटातील ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन बनवण्यात आलेल्या सिग्नेचर ज्वेलरी हे मलाबार गोल्ड आणि डायमंड्सचे खास वैशिष्टय आहे. रोजच्या वापरातील दागिने, पार्टी वेअर, लग्न समारंभासाठी विशेष दागिने जे ब्राईड्स ऑफ इंडिया कलेक्शन म्हणून परिचित आहेत तसेच 18 कॅरेटचे लाईट वेट दागिने अशी विविध प्रकारची ज्वेलरी या शोरूममध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर माईन, एरा, एथनिक्स, डिव्हाईन, प्रेशिया, स्टारलेट या उप ब्रांडची उत्पादनेही उपलब्ध आहेत.

 

ओ. आशेर म्हणाले कि, पारदर्शकता, गुणवत्ता आणि सचोटी हाच आमच्या व्यवसायाचा गाभा आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या आवडीनुसार डिजाईन करण्यात आलेले दागिने यामुळे आम्हाला जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे.

 

'मेरी तंदुरुस्ती का राज है कोल्हापुरी मटण' -अनिल कपूर

कसा काय कोल्हापूर... चाळीस वर्षापूर्वी मी याच कोल्हापुरात आलो. इथल्या मातीतच मी माझ्या करियरला सुरुवात  केली आणि याच कोल्हापूरच्या मातीने मला यशाची शिखरं पादाक्रांत करण्याची ताकद दिली. अशा शब्दात अनिल कपूरने कोल्हापूरचे वर्णन केले. 'मेरे तंदुरूस्ती का राज कोल्हापुरी मटण है'... अशा दिलखुलासपणे बॉलीवूडचा 'नायक' अनिल कपूर यांनी आज कोल्हापूरकरांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...