Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | A Student Commited Suicide In Ichalkaranji

बारावी परीक्षेच्या निकालाने चिंताग्रस्त विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 27, 2018, 04:37 PM IST

बारावी परीक्षेच्या निकालाच्या धास्तीने चिंताग्रस्त विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इचकरंजी येथे घडली

  • A Student Commited Suicide In Ichalkaranji

    कोल्हापूर- बारावी परीक्षेच्या निकालाच्या धास्तीने चिंताग्रस्त विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इचकरंजी येथे घडली आहे. महेश जोशी (18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शहरातील स्वामी अपार्टमेंटमध्ये आज सकाळी ही घटना घडली.


    मिळालेल्या माहीतीनुसार, एका कनिष्ठ महाविद्यालयात महेश शिकत होता. या वर्षी त्याने बारावीची परिक्षा दिली होती. परिक्षा झाल्यापासून तो निकालाच्या चिंतेत होता. या चिंतेतून त्याने मध्यारात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Trending