आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने इतिहासाची मोडतोड केली, हिसेंमागे तेच; भिडे गुरुजी यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली/कोल्हापूर- ‘संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनी शिवरायांचा इतिहास विकृत करुन मांडला आणि त्यांचाच कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे हात आहे.’ असा आरोप संभाजी भिडे गुरुजी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भिडे गुरुजी यांनी हे आरोप केले. जे घडले त्यामध्ये शिवप्रतिष्ठानचा अजिबात हात नाही, असे म्हणत भिडे गुरुजींनी आपल्यावरील आरोप फेटाळले. 

 

 

गोविंद गोपाळ यांच्या समाधीबाबत सावध भूमिका

वढू गावातील ज्या गोविंद गोपाळ यांच्या समाधीवरुन वादाला सुरुवात झाली होती. त्याबाबत भिडे गुरुजी म्हणाले, ‘गोविंद गोपाळ यांच्या समाधीबाबत फार काही माहित नाही. मला त्या इतिहासाबद्दल शून्य माहिती आहे. मी तिथे फक्त संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेतो.’

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...