Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | chandrakant patil reaction on sanjay rauts comment on CM fadnavis

पहाटे 3 पर्यंत काम करणा-या CM यांना कोणी काढेल का, चंद्रकांत पाटलांनी फेटाळली बदलाची शक्‍यता

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 25, 2018, 06:19 PM IST

पहाटे 3 वाजेपर्यंत जागून काम करणा-या मुख्‍यमंत्र्यांना कोण हटवणार, असा सवाल त्‍यांनी शिवसेनेला केला आहे.

  • chandrakant patil reaction on sanjay rauts comment on CM fadnavis

    कोल्‍हापूर - भाजपमध्‍ये मुख्‍यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय प्रधानमंत्री मोदी आणि भाजपाध्‍यक्ष अमित शहा घेतील, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र भाजप मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पहाटे 3 वाजेपर्यंत जागून काम करणा-या मुख्‍यमंत्र्यांना कोण हटवणार, असा उलट सवाल त्‍यांनी शिवसेनेला केला आहे.


    माझ्या वक्‍तव्‍याचा विपर्यास
    'मराठा आरक्षणाचा निर्णय आता कोर्टाच्‍या हातात आहे, जेवढे करणे शक्‍य होते तेवढे सरकारने केले.', असे वक्‍तव्‍य काल (मंगळवारी) चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याबद्दल बोलताना माझ्या या वक्‍तव्‍याचा विपर्यास करण्‍यात आला. मराठा समाजाला आरक्षण देणे हे माझे काम नसून बांधिलकी आहे, अशी सारवासारव करण्‍याचा प्रयत्‍न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तरीही कोणाच्‍या भावना दुखावल्‍या असतील तर मी दिलगीरी व्‍यक्‍त करतो, असे ते म्‍हणाले.

Trending