आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या हितासाठी शिवसेनेशी युती ही भाजपची अगतिकता- चंद्रकांत पाटील यांची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेना भाजप युती झाली नाही तर काँग्रेस पुन्हा विजयी होईल व काँग्रेसचा कारभार जनतेला माहिती आहे म्हणूनच सर्वसामान्य जनता व महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप शिवसेनेशी युती करण्यासाठी आगतिक आहे. तरीही शिवसेनेला युती करायची नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल     व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी पालघर मध्ये वनगा यांना उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांनी चुकीचे राजकारण केल्याचे स्पष्ट मत मांडले.

 

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले ना.चंद्रकांत पाटील हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. केंद्रात भाजप सरकारची चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी येथील शासकीय विश्रामधामवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी युतीबाबत मत मांडताना पालघर पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देताना उध्दव ठाकरे यांनी चुकीचे राजकारण केल्याचे सांगून, गेली 35 वर्षे वनगा यांच्या कुटुंबीयांकडे आमदार खासदार अशी पदे भाजपाने दिली. यावेळी स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या पत्नी की मुलाला उमेदवारी द्यायची याबाबतच्या निर्णयाला थोडा विलंब झाला. त्याचा फायदा घेऊन उद्धव ठाकरे यांनी राजकारण केले. 

 

शिवसेनेशी युती भाजपची अगतिकता
यावर आता सेना भाजपची युती होणारच नाही का असे विचारले असता, राज्यात लोकसभेनंतर अनेक निवडणुका सेना भाजपने स्वंतत्रपणे लढल्या असे सांगितले. यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यात शिवसेनेशी युती होईल असे म्हटले आहे. ही भाजपची आगतिकता आहे का असे विचारल्यावर मंत्री पाटील म्हणाले कि भाजपा हा पक्ष सर्वसामान्यांचे हित पाहणारा आहे. राज्यात शिवसेना भाजपा एकत्र लढण्यातच ते हित आहे. नाहीतर काँग्रेस विजयी होईल. सर्वसामान्यांच्या व महाराष्ट्राच्या हितासाठीच शिवसेनेशी युती करण्याची भाजपाची आगतिकता आहे, असे ते म्हणाले.

 

कुमारस्वामींना मुख्यमंत्री करणे जनतेचा अपमान
कर्नाटकातील सत्तासंघर्षावरून आपले मत व्यक्त करताना मंत्री पाटील म्हणाले 38 आमदार असताना आणि मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांना जनतेने झिडकारले असताना पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करणे हा जनतेचा अपमान व लोकशाहीचा खून आहे.भाजपाकडे 7 ते 8 आमदार कमी असल्याने काहीं आमदारांचे मन वळवणे हा घोडेबाजार नव्हता. कुमारस्वामी यांनी मात्र काँग्रेसच्या 78 आमदारांचा घोडेबाजार केला.  

 

 

बातम्या आणखी आहेत...