आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी राज्यातील 6 हजार गावे दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत  ११ हजार  गावे दुष्काळमुक्त झाली अाहेत. यंदा ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.  सांगली जिल्ह्यातील आवंढी (ता. जत) येथील भटकीमळा डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून  त्यांनी श्रमदान केले.

 

त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर अादी उपस्थित होते.  फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढवल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली  आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होऊ लागले. 

 

राजकारण,  गट-तट बाजूला सारून लोक पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजून घेऊन गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे. पाणी फाउंडेशनने जलसंधारणाचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मॉडेल तयार करून या कामात गावागावांचा सहभाग घेतला.

 

त्यामुळे अनेक गावांत जलसंधारणाची क्रांतिकारी लोकचळवळ उभी राहिली आहे. आज गावाचा धर्म, जात, पक्ष, गट या सर्वांचे ध्येय केवळ पाणी झाले आहे. सर्व जण एकदिलाने, एकजुटीने पाण्यासाठीच काम करत आहेत, ही सर्वार्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब अाहे.  

 

 

पुढील स्लाईडवर पहा मुख्यमंत्र्यांचे गावक-यांसोबत श्रमदानाचे निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...