Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | dhanjay munde target shivsena during hallabol yatra

धनंजय मुंडेंचा हल्लाबोल, म्हणाले- शिवसेनेची झाली 'भीवसेना', भाजपपुढे गाळते लाळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 09, 2018, 06:39 PM IST

वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत.

  • dhanjay munde target shivsena during hallabol yatra

    सातारा- धनंजय मुंडे यांनी साता-यातील पाटणमध्ये हल्लाबोल आंदोलनात ‍‍शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत. असे धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.

    राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने सत्ताधारी भाजप शिवसेनेवर हल्ला चढवत आहेत. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली. मुंडे यांनी पाटण नंतर उंब्रजमध्ये ही शिवसेना आणि मोदी सरकारवर हल्ला चढवला. मुंडे म्हणाले की, 2014 च्या काळात देशभरातील तरुणाई दीड-दीड फुट उड्या मारत ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा देत होती. त्यांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. आता मोदी तरुणांना म्हणतात भजी तळा. पंतप्रधान मोदींना याचा हिशोब द्यावा लागेल.

  • dhanjay munde target shivsena during hallabol yatra

Trending