आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, रेल्वेसमोर घेतली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे (फाइल फोटो) - Divya Marathi
राहुल सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे (फाइल फोटो)

कोल्हापूर- तळसंदे येथील इंजिनिअरिंग काॅलेजध्ये तिसर्‍या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी समोर आली. हा विद्यार्थी काल रात्रीपासून बेपत्ता होता. 

 

मिळालेल्या माहितीनुसार तिस-या वर्षाला शिकत असलेला राहुल परेकर याने काल सीएमपीएसचा शुक्रवारी पेपर दिला होता. हा पेपर त्याला अवघड गेला होता. यामुळे तो निराश होता. सायंकाळी मित्रांना फिरुन येतो असे सांगून तो रुमबाहेर पडला मात्र रात्र झाली तरी तो परतला नाही. आज सकाळी त्याने टाकळा परिसरातील परिसरात रेल्वेसमोर उडी मारुन आपले जीवन संपवले. त्याने सुसाईड नोटमध्ये पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. राहुल हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...